गोंदिया जिल्ह्यात 512 घरांची, 168 गोठ्यांची पडझड

0
29

गोंदिया-जिल्ह्यात गत काही दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टीची नोंदही झाली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 9 ते 14 सप्टेंबर दरम्यान 512 कच्च्या घरांची, 168 गोठ्यांची अंशतः तर 2 घरांची पुर्णतः पडझड झाली. 8 दुधाळ तर 3 ओढकाम करणारी जनावरे मृत्यूमुखी पडली. वरील सर्व नुकसानग्रस्त शासनाच्या मदतीस पात्र ठरविण्यात आले आहेत. यात सर्वाधिक नुकसान हे गोरेगाव तालुक्यात झाले आहे.
गत आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार 10 सप्टेंबर रोजी देवरी, सडक अर्जुनी, सालेकसा, गोरेगाव, 12 रोजी गोंदिया, गोरेगाव तर 13 रोजी पुन्हा सालेकसा तालुक्यात अतिवृष्टी झाली. याचा फटका शेती, घरे, गोठे व जनावरांनना बसला. गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक 147 घरे, 73 गोठ्यांचे नुकसान झाले. आमगाव तालुक्यात 96 घरे, 18 गोठे, देवरी 94 घेरे, 31 गोठे, अर्जुनी मोर 65 घरे, 5 गोठे, सालेकसा 62 घरे, 28 गोठे, गोंदिया 25 घरे, सडक अर्जुनी प्रत्येकी 13 घरे, गोठ्याचे नुकसान तर तिरोडा तालुक्यात 10 घरांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनने केली आहे. आपत्तीत 8 दुधाळ तर 3 ओढकाम करणारी जनावरे मृत्यूमुखी पडली.
 गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
गोरेगाव तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटक बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार गोरेगाव तालुक्यात दोनदा अतिवृष्टीची नोंद झाली. आतापर्यंत 1211.1 मिमी पाऊस झाला असून सरासरी टक्केवारी 118.1 आहे. गतवर्षीही गोरेगाव तलुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. हे उल्लेखनिय.