41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ गोरेगाव नगरपंचायतीला मिळाले अग्निशमन वाहन

गोरेगाव नगरपंचायतीला मिळाले अग्निशमन वाहन

0
35

blank

गोरेगाव,दि.१८:: येथील नगर पंचायतला जिल्हा नियोजन समिती मार्फत अग्निशमन बळकटीकरण योजना मधून निधी मिळाला होता. या योजनेअंतर्गत माजी नगराध्यक्ष इंजी. आशीष बारेवार यांनी मोठा फायर ब्रिगेडची मागणी केली होती. चार हजार लिटरच्या फायर व्हेईकल साठी मिळालेला निधी कमी होता त्यासाठी आमदार विजय राहंगडाले व माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजी. अशिष बारेवार यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये निधिच्या कमतरतेची बाब लावून धरली त्यामुळे  पालकमंत्री यांनी अतिरिक्त निधीला मंजुरी देऊन चार हजार लिटर क्षमतेचे अत्याधुनिक वाहन खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता या मार्फत आज नगरपंचायत गोरेगावला 4000 लिटर क्षमतेचे फायर व्हेईकल प्राप्त झाले व त्याचे लोकार्पण या क्षेत्राचे आमदार विजय राहंगडाले यांच्या हस्ते पार पाडण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष आशीष बारेवार,रेखलाल  टेंभरे बैंक डायरेक्टर,नप माजी उपाध्यक्ष सुरेश राहंगडाले,नप माजी सभापती रेवेंद्र बिसेन, भाजपा गटनेता हिरालालजी रहांगडाले, साहेबलालजी कटरे, इसुलालजी सोनवाने, मोरेश्वर कांबळे, मोरेश्वर रहांगडाले, हिदा येडे गुरुजी, सोनम येडेकर,मुन्नालाल बावनकर, संतोष रहांगडाले व इतर शहरातील मान्यवर उपस्थित होते.