ॲड.लखनसिंह कटरे यांची संमेलनाध्यक्ष पदी निवड

0
141

भंडारा,दि.१९::> दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, 12 डिसेंबर 2021 रविवारी, तुमसर, जि.भंडारा येथे नियोजित आहे.
05 सप्टेंबर 2021 ला नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पोवारी/पवारी बोली साहित्य, कला, संस्कृती मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संमेलनाचे स्थळ व तारखेची निश्चिती होऊन संमेलनाध्यक्षांची एकमताने निवड झाल्याचे मंडळाचे अध्यक्ष डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी औपचारिक घोषणा केली.
संमेलनाध्यक्ष म्हणून मराठीचे सुप्रसिद्ध/ख्यातकीर्त साहित्यिक, विचारवंत, निवृत्त शासकीय अधिकारी ॲड.लखनसिंह कटरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ॲड.लखनसिंह कटरे हे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य असून झाडीबोली साहित्य मंडळ साकोली, अखिल महाराष्ट्र बोली साहित्य संघ नागपूर व पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळ तिरोडा चे संस्थापक कार्यकारिणी सदस्य/पदाधिकारी आहेत. त्यांची मराठीत नऊ, हिंदीत दोन व पोवारी बोलीत एक अशी एकूण बारा पुस्तके आजवर प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या मराठी कवितेचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.काॅम. प्रथम वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला असून त्यांची मराठी कविता महाराष्ट्रभर गाजली/गाजत आहे. कटरे हे मराठी, हिंदी व इंग्रजी शिवाय झाडीबोली व पोवारी बोलीत सुद्धा लिहित असतात.
ज्येष्ठ नागरिक संघ आमगांव चे अध्यक्ष नरेन्द्रकुमार शुक्ला, सचिव संतोष कटकवार, जगदीश शर्मा, पुरुषोत्तमसिंह सोमवंशी, प्रकाश ढवळे, गिरधारी शिवणकर, कमलकिशोर खापर्डे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.