देवरीत जि.प. हायस्कूलमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार

0
84

पालकवर्गाकडून शाळेला दोन संगणकसंच भेट

देवरी,दि.19 – यावर्षी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार गेल्या शुक्रवारी (दि.17) स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे हे होते. यावेळी बक्षिसवितरक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालीवाल, प्रमुख अतिथी म्हणून गटसमन्वयक धनवंत कावळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मेश्राम, मुख्याध्यापक मंगल सयाम प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शैक्षणिक सत्र 2018 -19 मध्ये नवोदय विद्यालय प्रवेश प्राप्त दोन विद्यार्थी व शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य प्राप्त तीन विद्यार्थी, शैक्षणिक सत्र 2019 -20 मधील नवोदय विद्यालय प्रवेश प्राप्त नऊ विद्यार्थी व शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य प्राप्त पाच विद्यार्थी यांचा स्मृतिचिन्ह देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी श्री वाघदेवे या शिक्षकांचा सुद्धा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
उल्लेखनीय म्हणजे विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी पालकवर्गाकडून शाळेला दोन संगणक संच भेट देऊन श्री मोटघरे यांचेसह सर्व शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचलन टेटे यांनी केले. उपस्थितांचे आभार मनोज गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी
चोपकर, लांजेवार, टेकाम, आचले, झिंगरे, शिवणकर, नेताम, राऊत, सयाम, कापगते मॅडम, मरस्कोल्हे, शहारे मॅडम, बागडे आणि इतर कर्मचारी व पालकांनी सहकार्य केले.