भंडारा 0,गोंदिया 2,गडचिरोली 3,वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित

0
13

गोंदिया,दि.21 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 21 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज डिस्चार्ज
रुग्णांची संख्या शुन्य आहे.आजपर्यंत 41,220 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,504 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 9 आहे. 9 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 452052 नमूने पाठविण्यात आले.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य

भंडारा,दि.21:- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक आहे. आज 431 व्यक्तींची चाचणी केली असता 00 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 05 सक्रिय रुग्ण आहे.आज 01 रुग्ण बरा होऊन घरी गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58954 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60092 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 57 हजार 129 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60092 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58954 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60092 झाली असून 05 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित; एका व्यक्तीला डिस्चार्ज
मंगरूळपीर : जोगलदरी- १.एकूण पॉझिटिव्ह – ४१७४०,ऍक्टिव्ह – ५,डिस्चार्ज – ४१०९६,मृत्यू – ६३८

गडचिरोली जिल्ह्यात 833 तपासण्यांपैकी 3 कोरोना बाधित तर कोरोनामुक्त निरंक

गडचिरोली, (जिमाका) दि.21 : आज गडचिरोली जिल्हयात 833 कोरोना तपासण्यांपैकी नविन कोरोनाबाधित 3 तर
कोरोनामुक्त निरंक आहे . यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30763 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29997
आहे. तसेच सद्या 20 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू
कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.52 टक्के, सक्रिय रूग्णांचे
प्रमाण 0.07 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला.
नविन कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली 01 ,सिरोंचा 01,वडसा 01, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या निरंक
आहे.