हरभरा व गहू बियाणाचे शेतकऱ्यांना अनुदानावर वितरण नोंदणी करण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदत

0
57

गोंदिया,दि.21 : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली सन 2021-22 मध्ये
ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या रब्बी हंगामासाठी कृषि विभागामार्फत अनुदानीत दरात
बियाण्याचे वितरण या बाबीसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमातून
हरभरा व गहू पिकाकरीता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 25 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच
शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे. अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे
https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ असून अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास
संपर्क साधावा. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ई-मेलवर
किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदूराव
चव्हाण यांनी कळविले आहे.