जिल्ह्यातील 2 ताडी दुकानांचा ई-लिलाव

0
35

गोंदिया,दि.21 : महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि झाडांना खाप पाडणे नियम 1968 व महाराष्ट्र ताडी दुकाने (लिलाव नि-निविदाद्वारे अनुज्ञप्ती देणे) नुसार ताडी दुकानांबाबत अनुज्ञप्ती मंजूर करण्याचे महाराष्ट्र शासनाचे 30 ऑगस्ट 2021 चे गृह विभागाचे शासन निर्णय व राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांचे 1 सप्टेंबर 2021 चे पत्रानुसार आदेश पारीत केले आहेत. सदर आदेशाच्या तरतूदीनुसार जिल्हाधिकारी,गोंदिया यांनी सन 2021-22 या कालावधीसाठी ताडी विकण्याची दुकाने चालविण्याच्या एकूण 2 ताडी अनुज्ञप्त्या देण्यासाठी ई-लिलाव-नि-ई-निविदा खालीलप्रमाणे www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांचे कार्यालयात 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता तांत्रिक लिफाफा
उघडण्यात येईल. दुपारी 1 वाजता आर्थिक लिफाफा उघडण्यात येणार आहे. ऑनलाईन लिवावाची तारीख 30 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 3 वाजतापर्यंत राहील. 30 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता लिलाव मंजूर जाहिर करण्यात येणार आहे. असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रविण तांबे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.