जिल्हा परिषदेसमोर पशु चिकित्सा कर्मचार्यांचे धरणे

0
18

गोंदिया,दि. २६ : जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागात कार्यरत कर्मचाèयांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता आज(दि.२६) पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
जिल्ह्यातील पदविकाधारक सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्या विविध मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्या मागण्या तातडीने निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पशुसंवर्धन विभागातील कार्यरत कर्मचाèयांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव निकाली काढावे, पशुसंवर्धन विभागात कार्यरत कर्मचाèयांना दरमहा पाच तारखेच्या आत वेतन देण्यात यावे. कर्मचाèयांना जोखीम भत्ता व ठराविक प्रवास भत्ता मिळण्यासंदर्भात शासनस्तरावर शिफारस करण्यात यावी. तालुका लघु पशुसर्वचिकित्साालय येथे सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पर्यवेक्षक यांची किमान तीन पदे निर्माण करण्याकरिता शासनाकडे शिफारस करण्यात यावी. पशुसंवर्धन विभागातील सर्व कर्मचाèयांना शासनाचे ओळखपत्र जिल्हास्तरावरून देण्यात यावे. पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकारी यांची काही पदे रिक्त आहेत. त्यांना पुनर्जिवित करावे. सहावे वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधी खाते क्रमाकावर जमा करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा. प्रलंबित प्रवास देयके व किरकोळ खर्चाची देयकांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा. राज्यस्तरीय व स्थानिकस्तरीय सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची रिक्त पदे त्वरीत करण्याबाबत शासनाकडे शिफारस करावी आणि पशुवैद्यकीय दवाखाने यांना डाटा एन्ट्री ऑपरेटरचे कंत्राटी पद निर्माण करावे, आदी मागण्यांचा समावेश होता. धरणे आंदोलनाला प्रामुख्याने अध्यक्ष डॉ. परवेज सैय्यद, डॉ. विजय पडोळे, डॉ. पी. ए. शेगोकर, डॉ. व्ही. वाय बडोले, डॉ. आर. एन. येडे, डॉ. प्रतिक्षा सतदेवे, डॉ. सुनिल आकांत, डॉ. वाय. यु. वाघाये, डॉ. किशोर मुळे, रमेश भांडारकर,  महेंद्र हरिणखेडे, डॉ. एस. सी. गराडे, डॉ. जी. ए. येडेवार यांच्यासह जिल्ह्यातील सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, परीचर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे,संतोष तुरकर यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलंकाना पाठिंबा दिला.