मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार

0
7

गोंदिया/भंडारा : मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेल्या एका देहव्यापार करणार्‍या केंद्रावर धाड घालून चार महिला व चार पुरूषांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.या उलट गोंदियात मात्र काही पोलिस कर्मचारी अशा ठिकाणाहून अवैध वसुली करुन आपला पोट भरण्याचे काम करीत आहेत.गेल्या काही महिन्यापुर्वी सिविल लाईन भागातील नागरिकांनी तक्रार करुनही गोंदिया शहर पोलिस त्या अवैध अड्याला सरंक्षण देत वसुली करीत असल्याची चर्चा असून भंडारा सारखी कारवाई गोंदियात कधी इमानदारीचे गोडवे  गानारे पोलिस करणार अशा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी सवरेदय बहुउद्देशिय संस्थेच्या नावाखाली आयुर्वेद नॅचरोपॅथी अँण्ड फिजीयोथेरेपी उपचार व प्रशिक्षण केंद्र आहे.
सदर केंद्र विद्यानगर परिसरात राहणारी मालू गणेश पिपरोदे (४५) ही महिला चालविते. या केंद्रात मदर अँण्ड चाईल्ड मसाज सेंटरच्या नावाखाली याठिकाणी देह व्यापार सुरू असल्याची गोपणीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारला दुपारी सापळा रचून धाड टाकण्यात आली.
यात साकोली, टाकळी आणि गोंदिया जिल्ह्यातील र्मुी येथील महिला आढळून आली असून ईक्बाल गुलाब शेख (४४) रा.गांधी वॉर्ड भंडारा, प्रवेश दामोजी रंगारी (४१) रा. गांधी वॉर्ड भंडारा, प्रमोद ईस्तारी थोटे (३२) रा. जयस्तंभ चौक ता.मौदा, प्रशांत रघुनाथ भोयर (३६) रा.बोरगाव ता.मौदा जि.नागपूर यांना अटक करण्यात आल्या. त्या सर्वांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ चे कलम ३, ४, ५ (क) अन्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक गौरव गावंडे, प्रीतलाल रहांगडाले, बंडू नंदनवार, राजेश गजभिये, सुधीर मडामे, रोशन गजभिये, सावन जाधव, कौशिक गजभिये, चेतन पोटे, बबिता चौरे, कल्पना आकरे, सिंधू गुरनुले, अपेक्षिणी गजभिये यांनी केली