सुकन्या समृद्धी योजनेबाबत मार्गदर्शन

0
13

गोरेगाव : भाजपा महिला आघाडीची जिल्हास्तरीय बैठक ता. ५ जानेवारीला गोंदिया येथील राईस मिल असोसिएशन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व भाजपा महिला आघाडी पदाधिकारी, भाजपा कार्यालया जवळ कार्यकर्त्या हीलांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन महिला आघाडी प्रदेश सचिव व जिल्हाध्यक्षा सिताबाई रहांगडाले यांनी केले आहे. या बैठकीत केंद्र सरकार तर्फे महिला व मुलींकरिता सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्ध योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार असून फॉर्म भरणे व योजनेचा कालावधी व मिळणारा लाभ याबाबत माहिती देऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींना या सुकन्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांनीच प्रयत्न करून योजना प्रत्ये घरापर्यंत पोचवून १ ते १0 वर्षापर्यन्तच्या सुमन्यांना समाविष्ट करण्याचे आव्हान सिताताई रहांगडाले यांनी केले आहे. या बैठीला भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले,आ. संजय पुराम, जि. प. उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, छायाताई दसरे, देवराव वडगाये उपस्थित राहणार आहे. यावेळी समाजात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे