ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालयासाठी लढा उभारणार-पटोले

0
9

गोंदिया दि.५: घटनेने अधिकार देऊनसुद्धा बहुसंख्य ओबीसी समुदाय आपल्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे. आरक्षणातून ओबीसींना डावलण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी ओबीसींनी एकत्रीत येण्याची गरज आहे. स्कॉलरसीप आणि प्रफ्ीशीपच्या पेफ्छयात अडकल्याने ओबीसी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. एससी आणि एसटी प्रवर्गानुसार ओबीसींनाही त्यांच्या हक्क व अधिकारापासून स्वतंत्र मंत्रालयाची गरज आहे. या मंत्रालयासाठी ओबीसींना घेऊन लढा उभारू असे मत खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले. गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने रविवारला आढावा बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान या बैठकीला उपस्थित खा.नाना पटोले यांनी ओबीसींना एक होण्याच्या आवाहन केले. तसेच ओबीसीतंर्गत येणार्या सर्व समाजसंघटनांच्या प्रमुखांची व राजकीय पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या प्रमुखांसोबत चर्चा करण्यासाठी ओबीसी संघर्ष समितीने पुढाकार घ्यावे आपण राजकारण बाजुला सारुन सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पटोले पुढे म्हणाले की, ओबीसींना स्वत:च्या हक्क व अधिकाराची जाणीव होणे आवश्यक आहे. समाजाची गरज न समजता स्वत:ची गरज समजुन प्रत्येक ओबीसीने ओबीसी कृती समितीच्या लढ्यात सहभागी होऊन समाजऋण पेफ्डावे. मागणी पुर्ण होत नसतील तर प्रसंगी लढा उभारण्याची तयारी देखील ठेवावी. लढ्याला आमचा पुर्ण पाठींबा असेल असेही ते म्हणाले. आढावा बैठकीदरम्यान गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे एच.एच.पारधी, हि.द. कटरे,मनोज मेंढे, दुर्गेश रहांगडाले, खेमेंद्र कटरे, बंटी पंचबुद्धे, संजीव रहांगडाले, चंद्रकुमार बहेकार, राजीव ठकरेले, कृपाल रहांगडाले, आशिष नागपुरे, वैफ्लास भेलावे, निलम हलमारे, त्रिभूवन पटले, भेलावे, पन्नालाल मचाळे आदिंसह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. दरम्यान येत्या २५ जानेवारीला पुन्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पुढील वाटचालीचे नियोजन केले जाणार आहे. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील समस्त ओबीसींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.