पालकमंत्री प्राजक्त तनपुरे 11 व 12 एप्रिलला भूमिपूजन कार्यक्रमाकरीता जिल्ह्यात

0
99

गोंदिया,दि.8 : पालकमंत्री प्राजक्त तनपुरे हे 11 व 12 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 11 एप्रिल रोजी सकाळी 9.15 वाजता नागपूर विमानतळ येथून शासकीय वाहनाने गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 12 वाजता गोंदिया येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गोंदिया जिल्हा आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था बाबत आढावा बैठक. दुपारी 4.30 वाजता रेलटोली, गोंदिया येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता जिल्हा क्रिडा संकुल गोंदिया येथे टेनिस कोर्ट व बास्केट कोर्टचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया कडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव-मुक्काम.

12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून गोरेगाव कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता गोरेगाव येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता गोरेगाव येथून सडक अर्जुनी तालुक्यातील सितेपार कडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता सितेपार येथे आगमन व पांढरी-सितेपार-कोसमतोंडी नदीवरील पुलाचे भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता सितेपार येथून कोसमतोंडी कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता कोसमतोंडी येथे आगमन व कोसमतोंडी-बोळुंदा नदीवरील पुलाचे भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता कोसमतोंडी येथून गिरोला-खोडशिवनी कडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता गिरोला-खोडशिवनी येथे आगमन व गिरोला-खोडशिवनी-खजरी या मार्गावरील पुलाचे भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 2 वाजता गिरोला-खोडशिवनी येथून म्हसवाणी कडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता म्हसवाणी येथे आगमन व गिरोला-खोडशिवनी-खजरी या मार्गावरील पुलाचे भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता म्हसवाणी येथून कोहमारा कडे प्रयाण. दुपारी 3 वाजता कोहमारा येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता कोहमारा येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील.