डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने निघाली भव्य मोटारसायकल रॅली

0
23

गोंदिया,दि.13 -परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने आज 13 एप्रिल रोजी शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भीमनगर मैदान येथून सकाळी 10 वाजता या रॅलीला झेंडी दाखवून रवाना करण्यात आली.त्यानंतर शहरातील प्रत्येक भागात या मोटारसायकल रॅलीत सहभागी झालेला जत्था भ्रमंती करीत जयभीमच्या गर्जेनेने दणाणून सोडले होते.या मोटारसायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने एसी एसटी ओबीसी बहुजन समाजातील बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन रॅली निघाली.अध्यक्ष राजेंद्र वैदय,विलास राऊत, देवा रुषे,नागरत्न बनसोड,अनिल सुखदेवे,निलेश देशभ्रतार,रविकांत कोटांगले हर्षपाल रंगारी,शैलेश टेंभेकर,अमर राहुल,वेदांत गजभिए,लक्ष्मीकांत डहाट, आकाश इंदूरकर, रोहित वैद्य, निशांत वहाने, प्रसिद्धि प्रमुख सतीश पारधी, महेश ठवरे, डिलेश्वरी ठाकरे, नागो बंसोड, सुनिल भालेराव, बहुजन वसंत,रवी भालाधरे,धीरज मेश्राम,श्याम चौरे यांच्यासह हजारोच्या संख्येने महिला पुरुष युवकांचा समावेश होता.