सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा

0
15

गोरेगाव,दि.13- स्थानिक पी.डी.राहांगडाले विद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म रा पुणेच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्हा जातपडताळणी समितीच्या साहाय्याने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह अंतर्गत विविध समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने जातप्रमाणपत्र वैधता बाबत विद्यार्थ्यांना कश्याप्रकारे प्रस्ताव सादर करायचे व अचूक प्रस्ताव करिता लागणारी कागदपत्रांच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात गोंदिया जिल्हा जातपडताळणी समितीचे उपायुक्त व सदस्य सचिव राजेश पांडे,संशोधन अधिकारी मोहतुरे,विधी अधिकारी पाटणकर यांच्यासह प्राचार्य सी.डी.मोरघडे,पर्यवेक्षक वाय.आर.चौधरी,प्रा.सी.आर.बिसेन,प्रा.एस.एम.नंदेश्वर,प्रा.डी.बी.चाटे,प्रा.डी.एम.राठोड, ए.एच.कटरे,आर.वाय.कटरे,कु.दमाहे,आय.बी.पटले, मुकुंद बागडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.