Home विदर्भ तिरोडा,वाशिमसह चंद्रपूरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

तिरोडा,वाशिमसह चंद्रपूरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

0

राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी

तिरोडा,दि.14ः-येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन बुध्द वंदनेसह केक कापून अभिवादन करण्यात आले. यावेळी भिवापूर येथील माजी सेवा सहकारी अध्यक्ष आसाराम भगत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत(गुड्डू) बोपचे यांनी पक्षाचा अधिकृतपणे दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रामुख्याने राजलक्ष्मीताई तुरकर(महिला जिल्हाध्यक्ष),अविनाश जायस्वाल(जिल्हाध्यक्ष डॉ सेल), युवा नेते रविकांत(गुड्डू) बोपचे,जगदीश बावनथडे(जि. प. सदस्य),जितेंद्र चौधरी(प.स. सदस्य),वाय.टी.कटरे (माजी सभापती),राजेंद्र ठाकरे(तालुकाध्यक्ष obc सेल),किरणभाऊ बंसोड(तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय सेल),जयाताई धावडे,रामसागर धावडे,युवराज शहारे,मुन्नालाल बिंझाडे(उपाध्यक्ष, सामाजिक न्याय सेल),देवेंद्र चौधरी,बाबुराव डोमळे(काका), वनमालाताई डहाके, लखन रहांगडाले, संजय रहांगडाले,विजय बुराडे, टिपू सैय्यद,आसाराम भगत,यशवंतराव परतेती आदिंसह पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

वाशिम, दि.14– भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आज 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात त्यांच्या प्रतिमेस प्र.जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,नपा प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयाचे नाझर आनंद आरू, अ.का.प्रविण चव्हाण, महसूल सहाय्यक शितल पावडे,स्वीय सहाय्यक श्री.खडसे,प्र.सहाय्यक अधीक्षक धनंजय कांबळे, नितीन सिरसाठ,किरीष बंगारे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सुध्दा डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 
चंद्रपूर:- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महिला अध्यक्षा सुनिता ताई पाटील यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शहराच्या मुख्य आंबेडकर चौकात भव्य पेडांल उभारुन महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. मसाला भात तथा शरबत वाटप करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली सत्ता स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. सध्या व्यवस्था परिवर्तनाची खरी गरज आहे बाबासाहेबांच्या अनुयायांनी आम आदमी पार्टीचे हात बळकट करण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाचे लढ्यात सामील व्हावे व बाबासाहेबांचे स्वप्न साकार करावे असे जयंती दिनी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांनी आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश‌ चेडगुलवार आणी सिकंदर सागोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी भिवराज सोनी , मयुर राईकवार, दिलीप तेलंग,  राजू कुडे, सुजाता बोधेले,आरतीताई आगलावे ,कालिदास ओरके, सुनिल सदभय्या ,संतोष बोपचे,पवन वाघमारे, प्रशांत रामटेके, राहुल ठावरी, मनोहर पाटील, निलेश रामटेके,  राजकुमार कांबळे, दिलेश पाटील, निलेश मून , चैतन्य पाटील, प्रणय पाटील, सनद पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद चिवंडे, संजय भ्रामने, कुणाल माते, योगेश आपटे, संदीप तुर्क्याल, सुखदेव दारुण्डे,   भीमराव मेंढे , निखिल बारसागडे, पपू पाझारे, गोकुल बनसोड,  मंगला मुक्के , शबनम शेख, रूपा काटकर, , इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित  होते.

Exit mobile version