नगर परिषदेतर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

0
16

गोंदिया,दि.15- नगरपरिषद गोंदियाच्या  अग्निशमन आणिबाणी सेवाविभागाकडून अग्निशमन विभागातील ६६ शहीद अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अग्निशमन सेवा सप्ताहाचे १४ ते २0 एप्रिलदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या सेवा सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार (ता.१४) सकाळी ९ वाजता शहीद ज्योत प्रज्वलित आणि धोजारोहण मुख्याधिकारी करणकुमार चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. १५ एप्रिल रोजी अग्निशमन कार्यालयात कर्मचार्‍यांना मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. १६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन अग्निशमन विभाग गणेशनगर येथील कार्यालयात करण्यात आले आहे. १७ एप्रिल रोजी इंडियन रेडक्रॉस सोसाइटी तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन, १८ एप्रिल रोजी अग्निशमन प्रत्याक्षिक, १९ एप्रिल रोजी फेग (लॉग )मार्च नगर परिषद कार्यालयातून शहर भ्रमण व २0 एप्रिल रोजी सध्याकाळी ४ वाजता पुरस्कार वितरण व समापन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
समापन सोहळ्याला आमदार विनोद अग्रवाल, मोटर परिवहन विभाग पोलिस निरीक्षक राजेश लबळे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, प्रभारी अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी मोहनीश नागदवने, जाकिर बेग, मने, भरणे, पटले हे परिश्रण घेत आहेत.