जैन समाजबांधवातर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात

0
22

गोंदिया : जैन समाज बांधवांच्या वतीने भगवात महावीर जयंती आज (ता.१४) मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरी करण्यात आली. यानिमित्त नगरात शोभायात्राच्या माध्यमातून भगवान महावीर यांचे संदेश जनतेपयर्ंत पोहोचविण्यात आले. जयंती उत्सवात जैन समाजाच्या बंधू-भगिनी मोठय़ाप्रमाणात सहभागी झाले होते.
गोरेगाव : भगवान महावीर जयंती निमित्त स्थानिक जैन समाजातर्पेष्ठ आज सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावर शोभायात्रेच्या माध्यमातून सर्व सामान्यांपर्यंत भगवान महावीर यांचा संदेश पोहोचविण्यात आला. यानंतर विधीवत पूजा-अर्चना करण्यात आली. यावेळी उत्तमचंद जैन, प्रमोद जैन, गणेश जैन, अनुराग जैन, कोमल जैन, मनीष जैन, नमन जैन, कुशल जैन, प्रवीण जैन यांच्यासह मोठय़ाप्रमाणात जैन समाजाचे बंधू-भगिनी सहभागी झाले होते.
गोंदिया : स्थानिक जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सत्य अहिंसा, जिओ और जिने दो के नारो आदिंच्या घोषणांनी परिसर दुमदुमले होते. रजत पालकीत विराजमान भगवान महावीर यांची नयनाभिराम पालकीला माजी आमदार राजेंद्र जैन व डीसीसी बँकेचे संचालक राजू एन. जैन यांनी नमन केले. यावेळी मोठय़ा संख्येत भाविक, समाजबांधव उपस्थित झाले होते.