आमगाव-देवरी मतदार संघातील वीज लोडशेडिंग रद्द करा

0
31

देवरी : गोंदिया जिल्ह्यातील आमगांव-देवरी विधानसभा मतदार संघातील देवरी, आमगाव व सालेकसा हा तालुका आदिवासी, अतिदुर्गम, संवेदनशील, नक्षलग्रस्त व डोंगराळ भागात आहे. येथे सुरू असलेली वीज लोडशेडिंग रद्द करून वीज अखंडित सुरू करण्या संदर्भात आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.
निवेदनात आमदार कोरोटे यांनी आमगांव-देवरी विधानसभा मतदार संघातील देवरी, आमगाव व सालेकसा हा तालुका आदिवासी, अतिदुर्गम, अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त व डोंगराळ भागात वसलेला आहे.परंतु वीज वितरण कंपनी द्वारे सध्या या भागात रात्रीचे लोडशेडिंग सुरू केले आहे. या लोडशेडिंगमुळे रात्रीला घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षांपासूब बंद असलेली वीज लोडशेडिंग पुन्हा सुरू झाल्याने या भागातील जनतेला भर उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे.तरी रात्रीची सुरू असलेली लोडशेडिंग रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.