पुतळा नव्हे महामानव बाबासाहेब् आंबेडकरांची विटंबणा होय. : – डॉ. राजन माकणीकर

0
16

मुंबई दि.16 (प्रतिनिधी)- लातूर येथे नव्यानेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 72 फुट उंचीचा आसणस्थ पुतळा बसविण्यात आला आहे, मात्र हा पुतळा बाबासाहेबांचा नसून त्यांचा व्यंग करण्यात आला आहे. त्वरित पुतळा समिती, कलाकार वा खा. सुधाकर श्रुगारे यांचे ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष व पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक लढव्य्या संघटनेचे राष्ट्रीय महासचिंव् पॅन्थर डॉ. रजन माकणीकर यांनी *स्‍टेच्‍यू ऑफ नॉलेज” पुतळ्यावर आक्षेप घेतला असून मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्तांना तक्रार केली आहे, तक्रारीत विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर म्हणतात की, भाजपा कडून जाणीव पूर्वक बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या संबंधीत् घटना, वास्तु आणी गोष्टीवर जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला जात् आहे.

डॉ. आंबेडकर भवन, भीमा कोरेगाव, राजगृह व भारतीय संविधाना सोबतच आता लातूर येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या 72 फुटी पुतळ्यासोबत खोडसाळ पणा नव्हेच तर विद्रुपीकरण करण्यात आले आहे. सदरचा पुतळा आंबेडकरी अस्मितेला आघात असून त्वरित हा पुतळा हटवून नव्याने राजबिंडा व शोभनीय असा नविन् पुतळा उभारावा.

पुतळा समिती, खासदार श्रुगारे, भाजपा कार्यकारणी व कलाकार पुतळा महामानवाचा विद्रुप पुतळा बनवून जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून मागासवर्गीय व आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या प्रकरणी संबंधितांवर ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही करून तात्काल नव्याने सुंदर पुतळा बसवावा अशी मागणी करण्यात आली असून लवकरच या निर्णयावर सिक्कामोर्तब नाहि केल्यास् रिपाई फेमॉक्रॅटिक व पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा तीव्र आंदोलन करेल असा इशाराही विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी दिला.