32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ वाघाने केले शेतकऱ्याला ठार

वाघाने केले शेतकऱ्याला ठार

0
84
file photo

blank

ब्रम्हपुरी,दि.17ः शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने tiger हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार, 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. तुळशीराम सुकरु कांबळी (67, रा. आवळगाव) असे मृतकाचे नाव आहे. तुळशीराम कांबळी हे नित्यनियमाप्रमाणे आपल्या शेतामध्ये उन्हाळी धान व मिरच्या यांना पाणी देण्याकरिता शेतावर गेले होते.यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने ते खाली वाकले असता त्याच्यावर झडप घालून जागीच ठार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मिरचीच्या शेतातून जवळपास 200 ते 300 मीटर ओढत वैनगंगा
नदी किनारी घनदाट गवतात नेऊन ठेवला. मृतक शेतकरी आपल्या मुलीची तेली मेंढा या गावावरुन भेट घेऊन स्वगावी आले होेते.ते त्यानंतर लगेच ते शेतावर निघून गेले आणि वाघाचा tiger बळी ठरले. मृतदेह विच्छेदनासाठी रात्री ब्रम्हपुरी येथे आण्यात आला. यावेळी ब्रह्मपुरीचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित होते.तुळशीराम कांबळी यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी त्या वाघाने tiger होमराज सातपुते यांच्या शेळीवर हल्ला करून जखमी केले होते.सकाळपासूनच बोधना घाटावरील रस्त्यावर तो वाघ ठाण मांडून बसलेला होता, असे या रस्त्यावरून ये-जा करणारे शेतकरी सांगत होते.मृतक शेतकर्‍याला दोन मुले आणि एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. ब्रम्हपुरीचे उपविभागीय वनाधिकारी महेश चोपडे, आवळगावचे वनक्षेत्र सहायक ए. पी. करंडे,वनरक्षक एल. डी. सातपुते यांनी मृतकाच्या कुटूंबियांना 20 हजार रुपये तातडीची आर्थिक मदत दिली. जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे जंगली पशु नदीकिनारी वास्तव्यास आले आहेत. त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील जनता करीत आहे.

blank