गोंदिया रेल्वेस्थानकावर 884 पॅनलद्वारे 270 केव्ही सौरऊर्जा निर्मिती

0
50

गोंदिया,दि.17ः गोंदिया रेल्वे स्थानकावरील सर्व विद्युत उपकरणे सध्या सौर उर्जेवर चालविली जात आहेत.यासाठी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 3 ते 6 वर सौर उर्जानिर्मितीसाठी एकूण 884 सौर पॅनल लावून 270 केव्ही उर्जानिर्मिती केली जात आहे.एका पॅनलपासूनसू 325 वॅट सौर उर्जानिर्माण केली जाते.यासाठी स्मार्ट इनव्हर्टर लावण्यात आले आहेत.सौर उर्जेपासून तयार वीज आधी इनव्हर्टरला पुरवठा केली जाते.यासाठी 50 केव्हीचे 5 व 20 केव्हीचे 1 इनव्हर्टर
लावण्यात आले आहेत. तसेच या ठिकाणाहून विजेचा पुरवठा करण्यासाठी डिस्ट्रीब्युशन पॅनल लावण्यात आले आहे. या ठिकाणी एक मीटर लावण्यात आले असून येथून थेट वीजेचा पुरवठा केला जातो. गोंदिया रेल्वेस्थानकाला जेवढ्या विजेची गरज आहे,त्यापैकी 90 टक्के वीजनिर्मिती सौर उर्जेपासून केली जात आहे.गोंदिया रेल्वे स्थानकाला एकूण 350 केव्ही विजेची गरज असून त्यापैकी 270 केव्ही वीज निर्मिती ही सौर उर्जेपासून केली जात आहे.
याशिवाय पार्सल ऑफीसच्या छतावरही सौर पॅनल लावून 40 केव्ही स्वतंत्र वीज निर्मिती केली जात आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाला गरज असलेल्या एकूण 350 केव्ही विजेमध्ये पीट लाईन परिसरात उपयोग केल्या जाणार्‍या विजेचा सुद्धा समावेश आहे.