आ.कारेमोरे यांच्या हस्ते सर्पमित्राना किट व आँटो चालकाना सुरक्षा कार्डचे वाटप

0
14

भंडारा,दि.19ः – वरठी येथे ज्ञानसूर्य, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम गीताचा संगीतमय कार्यक्रम सुर भिमाचे कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजू कारेमोरे यांचे हस्ते माजी ग्रा.प सदस्य प्रा.बबन मेश्राम,अरविंद येळणे,उपसंरपच संजय मिरासे,ग्रा.प सदस्य विशाल शेन्डे,पु.भदन्त धम्मशिलो,श्रीकांत रामटेके,कल्याण डोंगरे,धनलाल मेश्राम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यानंतर आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे व पत्नी सौ.रंजीता राजू कारेमोरे याच्या विधानसभा क्षेत्रातील विकासात्म कार्ये बद्दल कार्यक्रमाचे आयोजक प.स सदस्य रितेश वासनिक व ग्रा.प सदस्य पवन रामटेके तसेच परी इंटरप्राइजेस व मित्र परिवार च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे,सौ. रंजीत राजु कारेमोरे व परी इंटरप्राईजेस च्या वतिने सर्पमित्र यांना किट वाटप करण्यात आली तर ऑटो रिक्षा चालकांना सुरक्षा कार्ड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पवन रामटेके, रितेश वासनिक, परी इंटरप्राईजेस व मित्र परिवार वरठी यांच्यातर्फे करण्यात आला होता, याप्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत प्रमुख पदाधिकारी सदस्य, सामाजिक कार्यकर्ता, समाजसेविका, ब्लू फायर ग्रुप वरठी चे प्रमुख पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.