तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

0
29

सडक अर्जुनी:- तालुक्यातील ग्राम डोंगरगाव/खजरी येथे परमपुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांची सोलर एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (SECI) संचालकपदावर निवड झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, भुपेंद्र गणवीर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलु कटरे,समाज प्रबोधनकार रोशन कराडे,माजी जि.प.उपाध्यक्ष छायाताई चौव्हाण, दिनेश हुकरे, राजेश रामटेके,जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्वर पटले,जि.प. सदस्या कु.कविताताई रंगारी,जि.प.सदस्या सौ.निशाताई तोडासे,पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये,पं.स.सदस्य शालींदर कापगते,पं.स.सदस्या सौ.संगीताताई खोब्रागडे,पं.स.सदस्या सौ.वर्षाताई शहारे,तुकाराम राणे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.