वरुड येथील आरोग्य महायज्ञ शिबिराला हजारो रुग्णांचा प्रतीसाद

0
22

वरुड  :मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यामध्ये भव्य आरोग्य तपासणी महायज्ञ शिबिराचे आयोजन करून या आरोग्य महायज्ञ शिबिराच्या माध्यमातून विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली.
वरुड येथील आरोग्य महायज्ञ शिबिराच्या माध्यमातून २ दिवसांत हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली, या आरोग्य महायज्ञ शिबिराच्या माध्यमातून रुग्णांचे निदान करून शेकडो गरजू व गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आल्याने रुग्णांना या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे. महाआरोग्य शिबिरामध्ये शासकीय, खासगी डॉक्‍टर आणि विशेषज्ज्ञांनी सहभाग घेऊन हजारो रुग्णांची रुग्णांची तपासणी केली.
आमदार देवेंद्र भुयार यांनी यापूर्वी अनेक आरोग्य शिबिरे ग्रामीण भागात यशस्वीपणे घेऊन गरजूंना त्याचा लाभ मिळवून दिला. कोरोनामुळे दोन वर्षे शिबिर घेता आले नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली त्यामुळे वरुड येथे झालेल्या आरोग्य तपासणी महायज्ञ शिबिराच्या माध्यमातून नागरीकांना दिलासा मिळला आहे .
एखादा लोकप्रतिनिधी रुग्णसेवा करून शेकडो रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून मदत करून सामान्य माणसांना दिलासा मिळवून देण्यासाठी सामान्य माणसापर्यंत कसा पोहचू शकतो याचे आदर्श उदाहरण ठरत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे याबाबत नागरिकांकडून त्यांचे आभार मानले जात आहे .
या आरोग्य महायज्ञ शिबिराला अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तसेच स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या शिबिरात मोठे योगदान देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी आरोग्य महायज्ञ शिबिराला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र पाटील, सहायक गट विकास अधिकारी वासुदेव कानाटे, डॉ प्रमोद पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल देशमुख, रोशन दरोकर, संजय चक्रपाणी, प्रवीण देशमुख, सेवा दलाचे अध्यक्ष केशवराव यावले, गुड्डू पठाण, विष्णूपंत निकम, सुभाष शेळके, मीर गवसली , जगबीर सिंग भावे, बंटी धरमठोक,  तारेश देशमुख ,आशिष श्रीराव, कपिल परिहार, विजय वडस्कर ,राजू शिरस्कर, सुरज वडस्कर,बाल विकास प्रकल्प अधिकारी पवार म्याडम, डॉ गोधने,  डॉ सोनारे, डॉ केचे,  डॉ शितल राऊत, डॉ ठाकरे, डॉ प्रवीण चौधरी ,डॉ खेरडे, डॉ समता चौधरी, डॉ सौ खेरडे, डॉ मानकर, डॉ टेकोडे, दारोकर सिस्टर ,सुनील वाडेकर, श्री राऊत, श्रीमती भुस्कुटे, अंकुश मोरे, अंधारे, घ्यार, जिचकार , ददगाडे, तंतरपडे, राजेंद्र सावळकर, संतोष निंभोरकर, अंकुश खाजोने, आकाश नागपुरे, राधेश्याम पैठणकर, ग्रामिण रुग्णालय वरुड चे सर्व कर्मचारी, डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉ मंडळी, सर्व आशा सेविका सर्व अंगणवाडी सेविका ,मदतनीस , गट प्रवर्तीका यांनी या शिबर यशस्वी होण्याकरिता अथक परिश्रम घेतले

वरुड तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधेचा फायदा व्हावा यासाठी आरोग्य महायज्ञ शिबिराचे आयोजन केले असून आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये मेडिसिन विभाग, सर्जरी विभाग, बालरोग तज्ञ, कान नाक घसा, स्त्री रोग तज्ञ, डोळ्यांचे विकार, अस्‍तीरोग, ह्रदयविकार, बालकांच्‍या विविधआजारांबाबत तपासण्‍या करण्यात आल्या असून त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. — आमदार देवेंद्र भुयार