ग्रंथ दिनानिमित्त साहित्य परिषदेतर्फे परिसंवादाचे आयोजन

0
23

नागपूर : २१ एप्रिल – २३ एप्रिल २०२२ हा दिवस जागतिक ग्रंथ दिवस म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावर झाशी राणी चौकाजवळ सेवासदन हायस्कुलच्या माई मोतलग सभागृहात २१ व्या शतकातील  ग्रंथव्यवहार कसा आहे? आणि कसा असावा? या विषयावर आयोजित या परिसंवादात साहित्यिक आणि समीक्षक रश्मी पदवाड मदनकर, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रकाशक विनोद लोकरे  वाङ्मयीन  संस्थेतील कार्यकर्ते  प्रकाश एदलाबादकर आणि व्यासंगी वाचक तुषार जोशी सहभागी होणार असून अ. भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे अध्यक्ष  आणि ख्यातनाम साहित्यिक ॲड.लखनसिंह कटरे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अ. भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष अविनाश पाठक , महामंत्री ऍड. सचिन नारळे, उपाध्यक्ष महेश आंबोकर आणि डॉ. अमृता इंदूरकर प्रभृतींनी केले आहे.