प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधांचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे – पटले

0
48

गोंदिया- गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्या अश्‍विनी रविकुमार (बंटी) पटले यांनी भेट देऊन उपस्थित वैद्यकीय अधिकारी चाचेरे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता फुंडे व एनआरएचएम अभियंता येडे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नवीन तयार इमारतीत एक मोठा हॉल पहिल्या माळ्यावर तयार करण्यात यावे, गंगाझरी आरोग्य उपकेंद्र येथून खर्रा हे गाव खूप अंतरावर असल्याने खर्रा येथे नवीन आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे, खळबंदा हे गाव धामनेवाडा या उपकेंद्राला जोडलेला असल्याने या दोन्ही गावामध्ये खूप अंतर आहे. म्हणून जो पयर्ंत त्या ठिकाणी नवीन उपकेंद्र होत नाही. तोपयर्ंत खळबंदा या गावाला गंगाझारी उपकेंद्राला जोडण्यात यावे, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी यांच्या साठी तयार असलेले क्वार्टर लवकरात लवकर तयार करून सर्व कर्मचारी यांना उपलब्ध करून द्यावे, दांडेगाव व धामनेवाडा येथील दोन्ही उपकेंद्राच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून, त्यांचे डीसमेंटल प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी नवीन इमारती मंजूर करण्यात यावे, अशी सूचना उपस्थित अधिकार्‍यांना जिल्हा जिल्हा सदस्या अश्‍विनी पटले यांनी दिले.