घरबसल्या ओपीडी ई-संजीवनी माध्यम सेवेचे उद््घाटन

0
22

गोंदिया- जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले असून, आरोग्यवर्धनी दिवसानिमित्त ई- संजीवनीच्या माध्यमातून आरोग्यवर्धनी केंद्राच्या ठिकाणी टॅली कन्सल्टेशन सेवा उपलब्ध राहणार आहे. या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धनी कार्यक्रमाला चार वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार १६ एप्रिल रोजी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून जि. प. सदस्य ममता वाढवे, पं. स. सदस्य कनीराम तावाडे, स्नेहा गौतम, सरपंच मीनल रामटेककर, गजेंद्र फुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी डॉ. शहजादा राजा, डॉ.त्रिपाठी डी.आय-ई.सी. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य वर्धनी समन्वयक डॉ. नम्रता दहाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटक संजय टेंभरे यांनी आरोग्यवर्धिनी दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आरोग्य योजनांचा लाभ कसा देता येईल, याबाबत आरोग्य प्रशासनाने प्रयत्न करावे, असे नमूद केले. डॉ. दिनेश सुतार यानी जिल्ह्यात २५८ पैकी २0९ उपकेंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. तर ४0 प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले असून, सर्व ठिकाणी ई- संजीवनीच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी टॅली कन्सल्टेशन सेवा देणार असुन प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया, तालुका आरोग्य अधिकारी गोंदिया तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी यांच्या सयुंक्त सहकार्याने पार पडला. सदर कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी वर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशासेविका, आरोग्य सहाय्यक जवंजाळ, आशा ब्लॉक समन्वयक मेंढे, जाधव, प्रितेश डाटा एंट्री ऑपरेटर उपस्थित होते. संचालन प्रशांत खरात तर आभार प्रदर्शन डॉ.मयुर टेंभुर्ने यांनी केले.