स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रिसोड येथे कौशल्य विकास प्रशिक्षणा अंतर्गत रांगोळी स्पर्धा संपन्न

0
25
वाशिम,दि.२९– जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटर रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.० तसेच संकल्प प्रकल्पा अंतर्गत कोविडमुळे मृत्य पावलेल्या कुटुंबातील व्यक्तीचे कौशल्य विकास प्रशिक्षणा अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी करीता रांगोळी स्पर्धा २८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत १५ प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
      कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिसोडचे तहसीलदार अजित शेलार होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, रोजगार मार्गदर्शन अधिकारी सिमा खिरोडकर,स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक श्री.काटे व श्रीमती काटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
              श्री.शेलार म्हणाले, कोविडमध्ये मृत्य पावलेल्या कुटुंबातील व्यक्तीकरिता “मिशन वात्सल्य” सुरु करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
              श्रीमती बजाज यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी केलेल्या विविध वस्तूची पाहणी केली. कौशल्य विकास प्रशिक्षणाचे महत्व सांगितले.
     श्री. काटे म्हणाले,या प्रशिक्षणामध्ये स्त्री आणि पुरुषांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येते.प्रशिक्षणार्थी नियमित प्रशिक्षणाचा लाभ घेतात.
       यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणासंबंधी किटचे वाटप करण्यात आले.या किटमध्ये टि शर्ट, डायरी/नोटपेड, पेन व निगडीत साहित्य वितरित करण्यात आले.
         रांगोळी स्पर्धेचे निकाल बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. श्रीमती खेळकर यांनी जाहीर केला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या तसेच सहभागी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
       कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कोशल्य विकास कार्यालयाचे एच.पी. राऊत तथा स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटर येथील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.