सत्ता स्थापनेपूर्वीच बदली प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जि.प.मध्ये लगीनघाई

0
91

सामान्य प्रशासन विभागाचा कार्यक्रम तयार : 5 मे पासून सुरुवात

गोंदिया,दि.30. जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचा कार्यक्रम सामान्य प्रशासन विभागाने घोषित केला आहे. जिल्हा परिषदेत 10 मे रोजी सत्ता स्थापन होणार असून 5 ते 15 मे दरम्यान बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे बदल्यांमध्ये पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नसणार आहे.

राज्य शासनाच्या 15 मे 2014 च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेत कार्यरत गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या 5 ते 15 मे या कालावधीत करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गट क आणि ड मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून त्याचा कार्यक्रम जिल्हा परिदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी जाहीर केला आहे. सामान्य प्रशासन विभागाची कार्यशाळा ५ मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 12, वित्त विभाग 5 मे रोजी सकाळी 12 ते दुपारी 1, कृषी विभाग 5 मे रोजी 1 ते 2, लघु पाटबंधारे विभाग 5 मे रोजी दुपारी 3 ते 4, बांधकाम विभाग 5 मे रोजी दुपारी 4 ते 5, पंचायत विभाग 6 मे रोजी सकाळी 11 ते 2, महिला बालकल्याण विभाग 6 मे रोजी 3 ते 3.30, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग 6 मे रोजी 3.30 ते 4, पशुसंवर्धन विभाग 6 मे रोजी चार ते 4.30, शिक्षण विभाग (प्राथ.) 6 मे रोजी दुपारी 4.30 ते 6 आणि आरोग्य विभागाची कार्यशाळा 9 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 1२ वाजतापर्यंत घेण्यात येणार आहे.