साकोली व लाखनी उड्डाणपूल सुरु करण्यासंबंधी केंद्रीय मंत्री गडकरींशी वर्षा पटेलांची चर्चा

0
69

भंडारा,दि.29ः- मनोहरभाई पटेल अ‍ॅॅकॅडमीच्या अध्यक्षा  वर्षाताई प्रफुल्ल पटेल या २८ एप्रिल रोजी दिल्लीवरुन नागपूरला विमानाने आल्या असता नागपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट झाली. या भेटीदरम्यान वर्षाताई पटेल यांनी साकोली व लाखनी येथील उड्डाणपूल लवकरात लवकर सुरु करण्यासंबंधी चर्चा केली.ना.गडकरी यांनी साकोली व लाखनी उड्डाणपूलावर नागरिकांकरीता लवकरात लवकर वाहतुकीस सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले,यावर वर्षाताई पटेल यांनी ना.गडकरी यांचे आभार मानले. मागील दोन-अडीच वर्षांपासून साकोली व लाखनी येथे महामार्गावर उड्डाणपूलाचे काम सुरु असून दोन्ही उड्डाणपूलाचे काम पूर्णत्वास आले आहे. पुलावरुन वाहतूक बंद असल्याने दोन्ही शहरांमध्ये वाहतुकीची मोठी समस्या आहेत. अनेकदा वाहतूक विस्कळीत होऊन वाहन धारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पूर्णत्वास आलेल्या साकोली व लाखनी उड्डाणपुलावरुन वाहतूक लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली होती. वर्षाताई पटेल यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने दोन्ही पुलांवर सोयीसुविधा उपलब्ध करुन वाहतुकीसाठी सुरु करण्यात यावे या संबंधी ना.नितीन गडकरी यांचेशी चर्चा केली.