कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम शेतकऱ्यांनी भोगवटदार १ करीता संपर्क साधावा

0
22
वाशिम,दि.30- शासनाचे ११ एप्रिल २०२२ चे परिपत्रक आणि विभागीय आयुक्त, अमरावती यांचे २२ जानेवारी २०२२ च्या पत्रानुसार मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम-१९५८ च्या कलम ५७ मधील पोटकलम (१) मध्ये दाखल केलेल्या परंतुकानुसार शेत जमिनीची खरेदी किंवा विक्रीच्या दिनांकापासून दहा वर्षांचा काळ लोटला असेल तर अशा शेतजमिनीची विक्री करण्यापूर्वी विक्रेत्यांनी जमीन महसूल आकारणीच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम शासनाला भरली असल्यास व अन्य शर्तीची पुर्तता करीत असल्यास ७/१२ सदरी असलेली नियंत्रित सत्ता प्रकाराची नोंद कमी करून उक्त जमिनीचा धारणाधिकार भोगवटदार वर्ग २ हा भोगवटदार वर्ग -१ करण्यात येणार आहे.
         सर्व कुळ कायदयाअंतर्गत प्राप्त जमीन धारकांनी त्यांचे कार्य क्षेत्रातील तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.शासन निर्णय व प्रचलित नियमानुसार नजराणा रक्कम व कागदपत्रे उपलब्ध करून सदर जमिनीचा धारणाधिकार रुपांतरीत करून घ्यावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांनी केले आहे.