मुंडीपार/सोनी व मजूर संघ कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

0
36

गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संघ कार्यालयात महाराष्ट्र दिन समारोह निमित्ताने 01 मे 2022 ला सकाळी 8.30 वाजता संघाचे उपाध्यक्ष दीपक कदम यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमांत संघाचे अध्यक्ष सचिन मिश्रा व संचालक रतन गोपलानी, श्रीमती कलावती जायस्वाल, संतोष भेलावे, समरीत नशिने, दीनेश द्वीवेदी व्यवस्थापक श्री चूटे व संस्थेचे प्रतिनिधी आणी कर्मचारी उपस्थित होते.

मुंडीपार ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र दिवस साजरा 
गोरेगांव:-1 मे महाराष्ट्र दिवसाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला. ग्रामपंचायत मुंडीपार येथे सरपंच सुमेंद्र धमगाये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.भारत माता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांची प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.यावेळी उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, सचिव अरविंद साखरे, तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी, ग्रा.पं.सदस्य दिनेश दिक्षीत, पंढरी कटरे,ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,राजेंद्र बिसेन, संघनक परिचालक रोहित पांडे, लिपीक सुनिल वाघाडे, परिचर अजय नेवारे,योगेश गमधरे,आरोग्य सेविका,आशा सेविका,अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

सोनी येथे महाराष्ट्र दिन साजरा
गोरेगाव ता 01:-‌ तालुक्यातील मणीभाई ईश्वरभाई पटेल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सोनी येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चक्रधर महाविद्यालयाचे प्रभारी ए. ओ. मेश्राम  तर ध्वजरोहक प्राचार्य बी. ए. जांगडे होते, तसेच वरिष्ठ शिक्षक जे. एम. बागडे, एस.एस.शहारे, प्रा. डि. एस. बिसेन, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.सर्वप्रथम राष्ट्रध्वजाचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रतिमेच्या स्वरुपात असलेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. एम.डि.पटले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.