तेढा येथे तलाव खोलीकरण कामाला सुरवात

0
22

गोरेगांव,दि.05:- तालुक्यातील ग्रामपंचायत तेढा येधे लघु पाटबंधारे विभागातर्गत मजुरांच्या हाताला काम म्हणुन गावातील तलाव खोलीकरणाच्या कामाचे 04 मे रोजीला जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत ,माजी समाज कल्याण सभापती कुसन घासले, पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे,माजी जि.प.सदस्य खुमेंद्र मेंढे, सरपंच राजेश पंधरे, उपसरपंच नरेश कोहळे,ग्रामपंचायत सदस्य सरिता पडोळे, सचिव सौ.एस.एस. कटरे,मनोज वाल्दे, ग्राम रोजगार सेवक रूपचंद उईके, माजी सरपंच रमेश वाघमारे, माजी उपसरपंच टेकचंद सांगोळकर, महावितरण ऑपरेटर कुवर भंडारी, प्रतिष्ठित नागरिक ओमप्रकाश राऊत, दिलीपकुमार वाघमारे, गेंदलाल औरासे व गावातील प्रतिष्ठित नागरिक,मजूर वर्ग इत्यादी उपस्थित होते.