मित्राचा खून; अवघ्या १0 तासात दोघांना अटक

0
126

भंडारा- क्षुल्लक वादातून दोन मित्रांनी आपल्या मित्राचा खून केल्याची घटना बुधवारी सकाळी अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत तर्िी/मिन्सी येथील जंगलात उघडकीस आली. अड्याळ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १0 तासात गुन्ह्याचा छडा लावून आरोपी असलेल्या दोन मित्रांना अटक केली.
तर्िी/मिन्सीच्या जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती अड्याळ पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी मृदतेहाची तपासणी केली असता चाकूने हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अनोळखी मृतदेह असलेल्या मृतकाचे नाव बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे (वय २७) रा. मुस्लिम लायब्ररी चौक, भंडारा असे आहे. तर आरोपींचे नाव कुशल सुरेशराव भरणे (वय २७) रा.चांदनी चौक भंडारा मूळ रा. विठ्ठल गुजरी वार्ड पवनी, निखील हुमदेव मेश्राम (२१) रा.समता नगर फेज ३ भंडारा असे नाव आहे.
तर्िी/ मिन्सीच्या जंगलात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, पवनी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना मृतकाची ओळख पटविण्यात यश आले. मृतक हा भंडारा येथील मुस्लीम लायब्ररी चौकातील रहिवासी मृतक बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे असल्याची खात्री झाल्याने तपासाची चक्र फिरवून मित्र व गावातील सर्व मित्रांची चौकशी केली. परंतु, कोणताही सुगावा लागत नव्हता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विवेक राऊत यांनी तांत्रिक दुव्याचा आधार घेत सीसीटीव्ही फुटेज गोळा केले व त्याचे कॉल डिटेल्सची माहिती गोळा केली. संशयाचे ढग कुशल सुरेशराव भरणे (वय २७), निखिल हुमदेव मेश्राम (वय २१) या दोघांवर संशय होत गेला. यावरुन दोघांची कसून चौकशी केली असता तेव्हा त्यांनी हत्या केल्याचे कबुल केले. आरोपींनी सांगितले की, मृतक बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे सोबत ते जंगल फिरण्यासाठी व भिलेवाडा येथील ढाब्यावर रात्री जेवनासाठी जात असतांना मृतकाने आरोपी कुशलची थट्टामस्करी केली. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. जंगल फिरुन झाल्यावर परततांना मृतक बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे व आरोपी कुशल सुरेशराव भरणे (वय २७), निखिल हुमदेव मेश्राम (वय २१) यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरुन शाब्दीक वाद झाला. त्यामुळे, मृतक बाळाने आरोपीवर चाकू उगारला. आरोपींनी त्याची मनधरणी करुन त्याच्याजवळील चाकू आपल्या ताब्यात घेतला. तेव्हासुद्धा बाळाने वाद सुरूच ठेवला होता. त्यानंतर आरोपी कुशल सुरेशराव भरणे याने मृतक बाळाच्या छातीत चाकूने वार करून पळ काढला.
स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक करून अड्याळ पोलिसांच्या ताब्यात दिला. पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे करीत आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, नितीनचंद्र राजकुमार, अभिजित पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे, विवेक राऊत, नितीन महाजन, किशोर मेर्शाम, नंदकिशोर मारबते, अंकोश पुराम, स्नेहल गजभिये, राज कापगते, अमोल खराबे, मंगेश माळोदे, सुमेध रामटेके यांनी केली