शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी पांदण रस्त्यावर भर-आमदार चंद्रिकापुरे

0
26

एक कोटीच्या मातोश्री पांदण रस्त्यांची कामांचे भूमिपूजन थाटात

अर्जुनी/मोरगांव,दि.05ः. कृषिमालाची वाहतूक करण्यासोबतच शेती यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी चांगल्या शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पांदण रस्त्यांच्या कामांना गती देऊन मंजूर पांदण रस्ते पावसळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना आमदार मनोह चंद्रिकापूरे यांनी दिले. ते तालुक्यात 1 कोटी रुपयाच्या निधीतून तयार होत असलेल्या मातोश्री पांदण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी 4 मे रोजी बोलत होते.

तालुक्यातील भिवखिडकी – जनबंधु वासनिक ते धनराज पुस्तोडे यांच्या शेतापर्यंत, कवठा – डोंगरगाव रोड ते जाधव भलावी यांचा शेतापर्यंत, देवलगाव – कवठा रोड ते वामन कापगते यांच्या शेतापर्यंत,सोमलपुर • बिडटोला येथे पतीराम कापसे ते गंगेझरी पर्यंत या चारही कामावर अंदाजे ९६ लक्ष खर्च होणार आहेत.
पुढे आमदार चंद्रिकापुरे म्हणाले की, शेती व शेतीपूरक उद्योग-व्यवसायांचा विकास होण्यासाठी पांदण रस्त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला चांगल्या शेतरस्त्यांची गरज आहे. मातोश्री पांदण रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 15 जूनपर्यंत पांदण रस्त्यांचे काम पूर्ण करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्यावे. ज्या गावात रोहयोच्या कामांवर मजुरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यकतेनुसार नवीन कामे हाती घ्यावीत. यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आर्थिक स्थैर लाभेल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.पांदण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी दिल्या.

या वेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे,तहसिलदार विनोद मेश्राम,गटविकास अधिकारी व्ही. आर. निमजे,जि.प.सदस्य कविताताई कापगते जि. प.सदस्य,प्रमोद लांजेवार,लोकपाल गहाणे,प.स.सदस्य.पुष्पलताताई द्रुगकर,सरपंच कविता गेडाम ,उपसरपंच अरविंद नागपुरे,ग्रा.प. सदस्य राजु मलगाम,वीणाताई वासनिक,ग्रामसेवक समीर रहांगडाले, असीमकुमार वासनिक ग्राम रोजगार सेवक, दिपालीताई कापगते सरपंच देऊळगाव, पतिराम मेश्राम सरपंच कवठा, निलेश्वर खूनी सरपंच सोमलपुर, विवेक बोरकर, शालिकराम नाकाडे, कालिदास पुस्तोडे, कोमल माडकाम, देवराव कोडापे, नामदेव कापगते, सरीताताई लनजे, सूनिताताई लंजे, भुमेश्वर परशुरामकर, सुरेश परशुरामकर, चोपराम लंजे, देवेंद्र लंजे, गजानन मेश्राम, भोजराम मुंगमोडे, एन.जी रामटेके कार्यक्रम अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.