शेतकऱ्याचा विकासात फार्मर प्रोड्युसर कंपनीचे महत्व-जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
45

गोंदिया,दि.05ः- राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड अंतर्गत श्री.गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया द्वारे संचालित, महात्मा ज्योतिबा फुले फार्मर प्रोडूयुसर कंपनी लिमिटेड बिरसोला-काटीच्यावतीने शेतकऱ्याचा विकासात फार्मर प्रोड्युसर कंपनीचे महत्व या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन 4 मे रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी नयना गुंडे म्हणाल्या की,जिल्हात निसर्गाने अतिशय सुंदर वातावरण दिलेले आहे,पावसाचे प्रमाण योग्य आहे.पाण्याचे संसाधन मुबलक असून शेतीविषयक व भाजीपाला,गुळ उत्पादनासाठी योग्य वातावरण व जमीन शेतकर्याकडे आहे.मशरूम सात्या मुबलक प्रमाणात मिळतात,त्यास चांगली बाजारपेठ उपलब्ध करण्यासोबतच मशरूम शेतीकरीता आराखडा तयार करण्याची सुचना करीत शेतकरी विकासात फार्मर प्रोड्युसर कंपनीचे महत्व असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव विजय बहेकार होते.प्रमुख अतिथी म्हणून नीरज जागरे,उदय खर्डनवीस,डॉ.सय्यद शाकीर अल्ली प्रकल्प समन्वयक, अविनाश लाड,राहुल गणवीर,तालुका कृषी अधिकारी डी.एल.तुमडाम, बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापक श्वेता डोंगरे,महात्मा ज्योतिबा फुले फार्मर प्रोडूयुसर कंपनी लिमिटेड बिरसोला-काटीचे संचालक जगलाल चौधरी उपस्थित होते.संस्थेच्यावतीने विजय बहेकार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा शाल व श्रीपळ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर आपल्या जिल्याचे मावळते DDM मा. नीरज जागरे व नवनिर्वाचित मा.अविनाश लाड DDM गोंदिया यांचा सत्कार मा. श्रीमती नयना गुंडे जिल्याधिकारी गोंदिया यांचे हस्ते कार्यात आला. विजय बहेकार यांनी महात्मा ज्योतिबा फुले फार्मर प्रोडूयुसर कंपनी लिमिटेड बिरसोला-काटीने आपले सभासद संख्या वाढविण्यासोबत शेयर्स जमा करण्यावर भर देत गावाच्या विकासासाठी स्मार्ट प्रोजेक्टबद्दल काम करण्याचे आवाहन केले.व्यवस्थापक गजानन अलोणे यांनी प्रास्ताविक केले.ज्योती टेंभूरकर यांनी संचालन तर शालू कृपाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.