सुसंस्कार शिबिर बालकांचे भविष्य घडविणारा कारखाना-आमदार मनोहर चंद्रिकापुरे

0
24

अर्जुनी मोरगाव,दि.07ः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचाराने प्रणित ग्रामगीताचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीगुरुदेव सेवा मंडळ सर्वांगीन बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. सर्वत्र गढूळ होत असलेले वातावरण बघता धावपळीच्या संगणकीय युगात सुसंस्कार शिबिर बालकाचे भविष्य घडविणारा कारखाना असल्याचे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले आहे.
श्री गुरुदेव सेवा मंडळ केशोरी कनेरी द्वारे 17 एप्रिल पासून10 दिवशीय बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन राधाकृष्ण हायस्कूल ईश्वरी कनेरी येथे केले आहे. शिबिरामध्ये 80 शिबिरार्थी रोज सामूदयीक प्रार्थना, हार्मोनियम, तबला, मलखांब ,बौद्धिक विकास, लाठीकाठी, कवायती मध्ये शिबिरार्थी सहभाग घेत आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की बालकाना दिले जाणारे प्रशिक्षण पाहून आपण भारावून गेलो. शिबिरात दिले जाणारे प्रशिक्षण थोडेबहुत बालकांनी कायमस्वरूपी अंगीकारल्यास यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल. राष्ट्रनिर्मिती त्यांचा हातभार सुद्धा लागेल.ते स्वतःचे व देशाचे भविष्य उज्वलकरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले .अशाप्रकारे शिबिराचे सर्वत्र आयोजन राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज आश्रम द्वारे करावेत असे सुद्धा ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला शिबीर प्रमुख गणेश बोदडे ,दुर्योधन मैंद, कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जूनी मोरगाव चे प्रशासक उद्धव मेहंदळे, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, योगेश नाकाडे, प्राचार्य संजय भांडारकर, कोमल शेंडे, वैद्य, प्रकाश वलथरे, प्राचार्य नंदेश्वर, अनिल लाडे, संगीत शिक्षक रवि गायकवाड, शारीरिक शिक्षक अक्षय देशमुख, तबला वादक किंनाके दादा ईतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भूपेंद्र चौहाण यांनी तर आभार दुर्योधन मैंद यांनी मानले.