तीन नगर परिषदांचा प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाला पुन्हा वेग

0
58

गोंदिया-राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल २0२0 ते मार्च २0२२ या कालावधीत मुदत संपलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुसंगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. मात्र, प्रभाग रचनेचे अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे राखून ठेवले होते. यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने उपरोक्त सुधार अधिनियमातंर्गत स्थगीत केलेल्या कार्यक्रमाला पुढे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुरूप गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व आमगाव या तीन नगर पंचायतीच्या प्रभाग रचना कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. कार्यक्रमानुसार ७ जूनपयर्ंत अंतिम अधिसुचना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रसिध्द करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुरूप ६ मे रोजी राज्यातील माहे-एप्रिल २0२0 ते मार्च २0२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व नवनिर्मित अशा एकूण २0७ नगर परिषदांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाला गती देण्याच्या अनुसंगाने पाऊल उचलले आहे. यामध्ये अ वगार्तील १६, ब वगार्तील ६७ तर क वगार्तील १२0 व नवनिर्मित ४ नगर परिषदांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुरूप स्थगीती देण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाला पुन्हा वेग देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. त्या अनसुंगाने निवडणूक आयोगाने गोंदिया जिल्ह्यातील तीन नगर परिषदांसह एकूण २0७ नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. यानुसार हरकती व सुचना मागविण्याचा कालावधी १0 ते १४ मेपयर्ंत, सुचना व हरकतीवर सुनावणी २३ मे, त्यावरील अभिप्राय अहवाल सादर करणे ३0 मे व अंतिम प्रभाग रचनेला ६ जूनपयर्ंत मान्यता देण्यात येणार आहे. तसेच अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी किंवा नगर परिषदेकडून ७ जून २0२२ पयर्ंत प्रसिध्द करण्यात येणार आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व आमगाव या तिन्ही नगर परिषद कार्यालयात प्रभाग रचनेच्या कामांना गती मिळणार आहे. तर दुसरीकडे स्थगीत असलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमामुळे सुस्त बसलेले इच्छूक पुन्हा कामाला लागले आहेत.