बाबासाहेब हे महानायक – माजी केंद्रीय मंत्री पटेल

0
19

नवेगावबांध दि.20: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे विद्वान होते. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने डॉ.आंबेडकरांचे विचार आत्मसात करने आवश्यक आहे. त्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटविला. त्यांनी दिलेली भाषणे आणि त्यांची ग्रंथसंपदा आजही सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे. डॉ. आंबेडकर हे शब्दातून सांगता येणारे व्यक्तीमत्व नसून त्यांच्या विद्वतेची अनुभूती घ्यावी लागते. डॉ. आंबेडकर हे मुक्यांना वाचा फोडणारे महानायक आहेत असे प्रतिपादन खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले.
ग्राम कोहलगाव येथे मंगळवारी (दि.१९) दि. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने आयोजीत सारीपुत्त बुद्ध विहाराच्या अनावरण कार्यक्रमाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे विदर्भ उपाध्यक्ष तथा धम्मप्रचारक बोधानंद गुरुजी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेंद्र जैन, भंते संघज्योती, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतीनिधी मनोहर चंद्रीकापुरे, पंचायत समिती सदस्य सुशीला हलमारे, जे.के. काळसर्पे, देवेंद्रनाथ चौबे, सरपंच बळीराम मडावी, उपसरपंच उल्हास डोंगरवार, कुंडलीक कंगाले, मुख्याध्यापक मारबते, अर्जुनी मोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव डोंगरवार, शंकरलाल उजवणे, आर.पी. पुगलिया महाविद्यालयाच्या प्राचार्या मंगला गडकरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी. गजघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक किशोर तरोणे यांनी मांडले. संचालन किशोर शंभरकर यांनी केले. आभार समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख मिथुन मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीराम राऊत, रवींद्र टेंभुर्णे, शरद शहारे, चुन्नीलाल टेंभुर्णे, संतोष शहारे, भीमराव टेंभुर्णे, राजेश शहारे, हिरा राऊत, विनीता शहारे, कैलाश शहारे, वैशाली टेंभुर्णे, रोशन शहारे आदिंनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.