नाना पटोले : थोर समाजसुधारकांचे विचार प्रेरणादायी

0
12

अर्जुनी मोरगाव दि.20:  ज्या थोर महामानवांनी समाज व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी अविरत परिश्रम घेतले ते कोण्या एका समाजाचे आदर्श न राहता सर्व बहूजन समाजाचे प्रेरणादायी ठरावे असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. बोदरा/देऊळगाव येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समितीच्यावतीने आयोजीत भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकूती पुतळय़ाच्या अनावरणाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आदिवासी सेवक प्रा. वामन शेडमाके होते. प्रमुख पाहुणे म्हणून हरिराम वरखडे, बी.एस. सयाम, कृषी अधिकारी धनराज तुमडाम, जिल्हा परिषद सदस्य मंदा कुंभरे, सरपंच जयवंता झोळे, माधो झोळे, डॉ. नाजुक कुंभरे, यशवंत कापगते, नाशिक कापगते, लक्ष्मी उईके, नवृत्ता नंदेश्‍वर, विना भैसारे, महादेव सलामे, शैलेष जायस्वाल, संजय पवार, भारत बडोले, विनोद बनकर, आनंदराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी समाजाला प्रेरणा देणारे वीर बिरसा मुंडा यांच्या पुतळय़ासमोर दीप प्रज्वलन, विधिवत पूजा अर्चना करुन मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले.