
पवनीतील शहीद स्मारक दुर्लक्षित.
पवनी,दि.30: महाराष्ट्रातील नगरपरिषदा व जिल्हा परिषदा यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे सर्व सदस्यांचे अधिकार संपुष्टात आले. त्यामुळे प्रशासक नगर परिषदेमध्ये नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे जनतेला येत असलेल्या अडचणींचे निवारण करण्यासाठी सदस्यांकडे न जाता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जाण्यासाठी लोकांना अडचणी येत आहेत. त्यासाठी प्रशासनाने वार्ड वाईस अधिकारी नेमून त्यांचे संपर्क क्रमांक प्रकाशित करून जनतेच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी सिटीझन फोरम पवनीने केली आहे.नगरपरिषद सदस्यांकडे गेल्यानंतर सध्या प्रशासक नेमण्यात आले असल्यामुळे आम्हाला बंधने आहेत असे सांगण्यात येते.
पवनी शहरात अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर स्मारक शहरात आहे परंतु प्रशासकीय दुर्लक्षामुळे स्मारकाच्या आवारातील स्वच्छता, झाडांना पाणी, झाडांची त्यांच्या प्रॉपर आकारानुसार आकार देणे, लाइट्स तुटून खाली पडलेल्या अवस्थेत आहेत, व स्मारक परिसरात लक्ष देणारा एक कर्मचारी या गोष्टींचा अभाव दिसून येते.
आणि तसेच शहरात अत्यंत रात्री बेरात्री प्रकाश्यकरीत Himax lights चौकाचौकात लावण्यात आलेले आहेत परंतु सध्याच्या परिस्थितीत ते बंद अवस्थेत आहेत या लाइट्स ची दुरुस्ती करून लवकरात लवकर चौकातील Himax light सुरू करावेत.
या वरील सर्व मुद्द्यांना घेऊन सिटिझन फोरम पवनी ने नगर परिषद पवनी ला निवेदन दिले व मागण्या पाच दिवसांचा आत पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करेल असे निवेदनात नमूद केले. निवेदन देण्याकरिता सिटीझन फोरम पवनीचे वैभव बावनकर, संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, उमेश वैद्य, विनीत मेश्राम, विनायक देविकर, उल्हास सावरकर, हिमांशू बावनकर, हर्षल लांजेवार, रितेश झगडू, ज्ञानेश्वर सुरपम, पारितोष वंजारी, निखिल शहारे, धृप बोटकुले वृषभ उडकुरकर आदि उपस्थित होते.