बापूसाहेबांचे जीवन सर्मपित कार्यकर्त्यासारखे

0
12

लाखनी,-सन १९७३-७४ मध्ये महाविद्यालयीन जीवनात विाद्यार्थी परिषदेचे कार्य करीत असताना भंडारा, लाखनी येथे येत होतो. तेव्हा बापूसाहेबांचे कार्य जवळून बघण्याची संधी मिळाली. सत्ता, पैसा, ताकद नव्हती त्या काळात बापूसाहेबांनी शिक्षणाचा प्रसार केला. बापूसाहेबांचे जीवन सर्मपित होते. शाळा मोठय़ा करण्यासाठी स्वार्थाचा विचार न करता पत्नीचे दागिने विकले, शेती विकली व संस्थेची उभारणी केली. बापूसाहेबांचे जीवन सर्मपित कार्यकर्त्यासारखे होते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्थानिक सर्मथ विद्यालयात शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळा व सर्मथ विद्यालयाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, आमदार राजेश काशिवार, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार संजय पुराम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, डॉ.प्रकाश मालगावे, संस्थेचे आल्हाद भांडारकर, मु.के. भांडारकर, न.ता. फरांडे, मधू लाड उपस्थित होते.

याप्रसंगी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते बापूसाहेब गौरव ग्रंथ व स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक आल्हाद भांडारकर यांनी केले. स्वागताध्यक्ष खासदार नाना पटोले म्हणाले, बापूसाहेबांनी लाखनीला शिक्षणाचे माहेरघर करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. आभारप्रदर्शन प्राचार्य प्रमोद धार्मिक यांनी केले.