
अमरावती,दि.२ (प्रतिनिधी): दर्यापुर येथे बुधवारी आलेल्या वादळी वारा व पावसाने मंगल कार्यालयाचे मोठे नुकसान होवून अनेक जण जखमी झाले होते. या जखमींची आज गुरुवारी खासदार नवनीत रवी राणा यांनी रूग्णालयात जावून भेट घेतली. यावेळी त्यांनी आस्थेने विचारपूस करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
दर्यापुर येथील मूर्तीजापुर मार्गावरील वैभव मंगल कार्यालय येथे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता वादळी वारा, पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लग्न सोहळ्यास उपस्थित ५० पेक्षा धिक नागरिक जखमी झाले. या वादळामुळे वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. मंगल कार्यालयावर तीन पत्रे उडाले होते. याशिवाय भिंतीच्या वीटा देखील काही उपस्थितांच्या अंगावर पडल्याने ते जखमी झाले होते. या प्रकाराने मंगल कार्यालयात चांगलाच हाहाकार उडाला होता..
दरम्यान, दर्यापुर येथील मंगल कार्यालयात आलेल्या वादळामुळे जखमी झालेल्या रूग्णांची आज खासदार नवनीत रवी राणा यांनी अमरावती येथील रूग्णालयात जावून भेट घेतली. खासदार नवनीत रवी राणा यांनी स्थानीक पंचवटी चौक परिसरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमींची भेट घेवून त्यांची विचारपूस केली.
००००००बॉक्स००००
मंगल कार्यालयात सुरक्षा महत्वाची : खासदार
दर्यापुर येथील मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी उपस्थित अनेकजण बुधवारी आलेल्या वादळी वाऱ्याने जखमी झाले होते. यातील अनेकजण वयोवृद्ध आहेत. काहींवर उपचार सुरु आहे. सुदैवाने यात दुर्दैवी घटना घडली नाही. परंतु पावसाळी दिवसात मंगल कार्यालयात सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे मंगल कार्यालयातील सुरक्षेचे ऑडीट देखील व्हायला पाहिजे. संबंधितांन ऑडीट करून घ्यायला पाहिजे असे खासदार नवनीत रवी राणा यांनी जखमींच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
०००० बॉक्स००००
सर्व जखमींच्या भेटी
खासदार नवनीत रवी राणा यांनी आज दर्यापुर येथील मंगल कार्यालयात वादळामुळे जखमी झालेल्या सर्व जखमींची भेट घेतली. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरु असणारे जखमी प्रमाणेच रूख्मीणी नगर येथील डॉ. सावदेकर यांच्या रूग्णालयात उपचाररत जखमींची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.