भाजप गोंदिया शहरतर्फे आरोग्य कर्मचार्‍यांचा सत्कार

0
19

– कुंभारेनगर प्राथमिक केंद्रात आयोजित कार्यक्रम

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत़ृत्वात केंद्र सरकारला यशस्वी ८ वर्ष पूर्ण झाल्याने सेवा- सुशासन- गरीब कल्याण या पंधरवडा कार्यक्रमातंर्गत आज ९ जून रोजी शहरातील कुंभारेनगर येथील आरोग्य केंद्रातील कोरोना काळात लसीकरण व उत्तम आरोग्य सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार भाजपा शहरतर्फे करण्यात आला़
भाजप शहर अध्यक्ष सुनिल केलनका यांच्या संयोजनात आयोजित या कार्यक्रमात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी शैलेष टेंभरे, स्वाती सहदेवे, वैशाली टेंभुर्णे, शालिनी चौव्हान, देवेंद्र हत्तीमारे, राकेश शेंडे, दिपा बावणकर, संगीता वरखडे, सुलोचना रहांगडाले, टुपेश्वरी पटले, वर्षा बोरकर, सुनिता ठाकरे, गायत्री पटले, एन.पी.भिवगडे, वर्षा पारधी, सरीता तिवारी, अरुणा वंजारी, माधुरी वंजारी, निधी चुटे, रश्मी डोरे, मिनाक्षी गायकवाड या कर्मचार्‍यांचा तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋचा कोतवाल, डॉ.प्रतिक्षा कांबळे, डॉ.अजित विश्वकर्मा, डॉ.दिपिका वाघमारे, डॉ.आकांक्षा वालदे, डॉ.सौरभ यादव यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जयंत शुक्ला, महिला मोर्चा शहर अध्यक्ष निर्मला मिश्रा, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री शालिनी डोंगरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पलाश लालवानी, सुरेश चंदनकर, संजय मुरकुटे, मनोज पटनायक, अंकित जैन, मनिष पोपट, बबली ठाकूर, अशोक जयसिंघानिया, गोल्डी गावंडे, सतिश मेश्राम, राकेश अग्रवाल, सुशिल राऊत, प्रशांत कोरे, पंकज भिवगडे, विक्रांत मिश्रा, रूपाली रोकडे, अंजू सरजारे, संध्या गंगभोज आदि उपस्थित होते.