३० जानेवारीला वैकल्पिक वाद निवारण केंद्राचे उदघाटन

0
8

गोंदिया,दि.२८ : गोंदिया येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे उदघाटन ३० जानेवारीला जिल्हा न्यायालय गोंदिया येथे सायंकाळी ६ वाजता उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्या. भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. पी.एन.देशमुख, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या सदस्य सचिव स्वप्ना जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी.गिरटकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक श्रीमती आय.ए.शेख/नाजीर व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.टी.बी.कटरे यांनी केले आहे.