सडक अर्जुनी नगरपंचायतचा भोंगळ कारभार,प्रत्येक कामात भ्रष्टाचार

0
30

सडक अर्जुनी,दि.16:– सडक अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये बनविलेल्या रोडाला भेगा पडल्या आहेत. नगरपंचायत अंतर्गत मनोहर डोंगरवार ते संजू प्रधान यांचे घरापर्यंत २०० मी. रोडावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत.या २०० मी.रोडाचे बांधकामामध्ये ५ लाख रुपये मंजूर झाले होते.त्यावेळेस नगरपंचायतच्या शि.ओ. चा प्रभारी कार्यभार नायब तहसीलदार भारती मेश्राम यांचेकडे होता.त्यांच्या कार्यकाळात नगरपंचायत चे अनेक विकास कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले होते. नायब तहसीलदार भारती मेश्राम यांचे कार्यकाळात नगरपंचायत मध्ये जर यांना घर नाही अशा अनेक लाभार्थ्यांचे घर असून जिर्ण झाले आहेत,अशा गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ न देता सडक अर्जुनी चे बाहेरील लोकांनी घेऊन ठेवलेल्या प्लाटवर घरकुल मंजूर करण्यात आले.याचे उदाहरण म्हणजे शेंडा येथील राऊत व तिडका येथील पंचभाई या दोघांचे नावे स्वत:चे गावी यांचे घर असून स्वगावी मतदार यादीत नाव असूनही सडक अर्जुनी नगरपंचायत मधील मतदार यादीवर कोणत्याच वार्डात नाव नसतांनीसुद्धा अडीच लाख रुपये मिळतात या लालसेपायी या दोघांचे घरकुल त्यांनी घेतलेल्या प्लाटवर घरकुलच्या नावावर ८ते१०लाखांची बिल्डींग तयार करण्यात आली.याकामात तेव्हाचे शि.ओ. भारती मेश्राम यांनी ५०-५० हजार रुपये घेतल्याचा आरोप नगरपंचायत च्या सदस्यांनी मासिक सभेमध्ये उचलला होता.पण याकडे शि.ओ. भारती मेश्राम दुर्लक्ष करीत होते.तसेच वार्ड नं. ११ मध्ये बालु वालोदे ते प्रकाश कुलभते यांचे घरापर्यंत रस्ता खडीकरण अंदाजे ४ लाख३४ हजार रुपये कार्यरत आदेश २४/८/२०१८ ते१४/१०/२०१८या कालावधीत खडीकरण करण्यात आले.या कामाचे कंत्राटदार गिरीश शुक्ला अर्जुनी मोरगाव यांनी रोडाचे बांधकाम केले.पण सन २०१९ मध्ये पूर्व पश्चिम दिशेला अतिक्रमण केले गेले.आजघडीला रोड बनवितांनी ६ मी.चा रोड ३ मी. वर राहिला आहे.असे अनेक प्रकरण नगरपंचायत मध्ये करण्यात आले आहेत.परंतू राजनितीच्या विळख्यात काही राजकारणी लोकांच्या दडपणाखाली व संगनमताने सदर प्रकरण दाबल्या गेले.सडक अर्जुनी नगरपंचायत च्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाला असून नगरपंचायतचा यावरून भोंगळ कारभार दिसून येतो.