सेवानिवृत्त प्राचार्य बारसागडे जागतिक पर्यावरण पुरस्काराने सन्मानित

0
24

देवरी,दि.20- देवरी तालुक्यातील बोरगाव बाजार  येथील शासकीय आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेशिडेन्शियल स्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जगदीश बारसागडे यांना नागपूर येथे आंतरराष्ट्रीय पीस क्राप्स संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण रक्षक आणि चंद्रपूर येथे पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने संयुक्तरीत्या पर्यावरणरत्न पुरस्तारान सन्मानित करण्यात आले.

 नागपूर येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे एम श्रीवास्तव यांचे हस्ते डॉ. बारसागडे यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील  पर्यावरण क्षेत्रात दिलेले विशेष योगदान याबद्दल जागतिक पर्यावरण रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय चंद्रपूर  येथील एका कार्यक्रमात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री  विजय वडेट्टीवार आणि स्थानिक दलित मित्र तथा आदिवासी सेवक डी के आरिकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बारसागडे यांना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पर्यावरण  क्षेत्रात केलेल्या भरीव  कामगिरीसाठी पर्यावरण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.