मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगा उपयुक्त-शिक्षणाधिकारी कादर शेख

0
26

गोंदिया, दि 21: मानवी जीवनात सृदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी  योगा नियमितपणे करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी जि. प. गोंदिया कादर शेख यांनी योगा दिनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. योग दिनानिमित्त आज जिल्हा क्रीडा संकुल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

          तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले आहे. सर्वप्रथम प्रमुख अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, प्रशासन, नेहरू युवा केंद्र, भारत स्कॉउट्स गाईड, अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ व जिल्हयातील विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जुन 2022 हा दिवस आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन जिल्हा क्रीडा संकुल मरारटोली गोंदिया येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन सिमा पाटणे नायब तहसिलदार, श्रृती डोंगरे युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र, श्रीमती चेतना ब्राम्हणकर, जिल्हा संघटक गोंदिया भारत स्कॉउट्स गाईड, कुंदा निनावे मॅनेजर, भाग्यश्री गाढे सीईओ दि. महिला अर्बन बॅक गोंदिया, एन एस. उईके राज्य क्रीडा मार्गदर्शक, धनंजय भारसाकडे, विशाल ईश्वरकर, विनय डोंगरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

       यावेळी योग क्षेत्रात विशेष कामगीरी करणारे खेळाडू अथर्व दीपक परमार, ओजस्वी परमार, भार्गव सुनिद्र मेश्राम यांना स्मृतीचिन्ह देवुन व माधुरी परमार योग व निसर्गपोचार तज्ञ यांचा ‘योगाचार्य अवार्ड’ देवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाअंतर्गत योग प्रशिक्षिका माधुरी वानकर (परमार) यांना कॉमन प्रोटोकालनुसार योगाचे प्रात्यक्षिके सादर केली. सदर कार्यक्रमात सरासरी 200 योगपटू सहभागी झालेले होते. कार्यक्रमाचे संचालक ए. बी. मरसकोले क्रीडा अधिकारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार एन. एस. उईके राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शिवचरण चौधरी, विनेश फुंडे, ऋतृराज यादव, नरेंद्र कोचे, शेखर बिरणवार, सुमितकुमार सुर्यवंशी, जयश्री भांडारकर यांनी अथक प्रयत्न केले.