चंद्रपूर-– येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते आणि तुकूम वार्डाचे माजी नगर सेवक श्री बंडूभाऊ मेंगाजी हजारें यांची ओबीसी समन्वय समितीचे मुख्य संयोजक बळीराज धोटे यांनी उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
बंडूभाऊ हजारें हे शिवसेनेचे माजी नगरसेवक असून ते कंत्राटी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते चंद्रपूर जिल्हा मच्छीमार संघांचे अध्यक्ष आहेत. मच्छीमार समाजाला व्यवसाया साठी तलाव अवंटन करतांना जिल्हा परिषद प्रशासनाने अन्याय करू नये यासाठी ते प्रयत्नशील असतात. बीजेपी च्या एका नगरसेवकाने ऐतिहासिक ताडोबा रोडचे निर्मला माता रोड असे नामकरण केले असतांना बंडूभाऊ हजारें यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट चे संघटक व सामाजिक सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान झाडे, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे प्रा योगेश दुधपाचारे, प्रा सूर्यकांत खनके, भास्कर डांगे, सुनील वाडस्कर व वार्डातील आणि तुकूम परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मदतीने ताडोबा रोडचे नामकरण पूर्ववत करण्यासाठी त्यांचा यशस्वी रीतीने विशेष पुढाकार होता.
हजारें यांनी सहकार्यांच्या मदतीने संविधान दिनी चंद्रपूर येथे दि 26 नोव्हे 2020 ला ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी निघालेल्या विशाल मोर्चात पुढाकार घेऊन सहभाग घेतला होता.हजारें आपल्या संघटन कौशल्याचा व जनसंपर्काचा ओबीसी जनगणना समन्वर समितीचे संघटन सशक्त करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील असा विस्वास मुख्य संयोजक बळीराज धोटे यांनी व्यक्त केला असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.