गोरेगाव तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू व 2 जखमी

0
181

गोरगाव,दि.23ः तालुक्यातील बोडुंदा व घोटी येथे आज 23 जून रोजी अचानक दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास विज पडल्याने शेतात काम करतांना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.यामध्ये बोडुंदा निवासी मृत व्यक्तीचे नाव जोशीराम झगडू उईके तर  घोटी येथील रामेश्वर ठाकरे यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला.त्यातच घोटी जवळील जानाटोला जवळील दिनदयाल पटले यांच्या शेतात काम करणारे दोघे व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.